admin यांनी गुरू, 03/09/2020 - 22:11 ह्यावेळी प्रकाशित केले.
लेखनप्रकार:
समारंभ वृत्तांत
प्रकार:
वृत्तांत
युगात्मा शरद जोशी यांची ८५ वी जयंती दिनांक ०३ सप्टेंबर २०२० रोजी महाराष्ट्रसह अनेक राज्यात साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर कार्यक्रम आयोजित करता आले नसले तरी सर्वत्र कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन करून छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सोबतच फेसबुक, व्हाटसप व अन्य सोशल माध्यमांचा वापर करून युगात्मा शरद जोशींना अभिवादन करण्यात आले.
गंगाधर मुटे यांनी मंगळ, 19/12/2017 - 23:13 ह्यावेळी प्रकाशित केले.
VDO:
VDO
लेखनप्रकार:
VDO
शेतकऱ्यांना स्वतःचा आवाज देणारा नेता हरपला
एबीपी माझा विशेष संपादित भाग
प्रसारण दिनांक -13/12/2015 सहभाग : गंगाधर मुटे, विजय जावंधिया, रघुनाथदादा पाटील, मिलिंद मुरुगकर, संजय पानसे, निर्मला जगझाप
शाम पवार यांनी सोम, 03/07/2017 - 22:19 ह्यावेळी प्रकाशित केले.
लेखनप्रकार:
योद्धा शेतकरी
शरद जोशी शोधताना
महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख सत्तेवर असताना, 'शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या आणि त्या रोखण्यासाठी दिली जाणारी अनुदाने (पॅकेजेस)' या विषयावर अभ्यास करून, त्यावर प्रभावी उपाययोजना सुचविण्याकरिता महाराष्ट्र शासनाने अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांची एकसदस्यीय समिती गठित केली होती. त्यावेळी मी या समितीला एक अनावृत पत्र लिहिले. दै. केसरीच्या दि. २ जून २००८च्या अंकात ते पत्र छापून आले. या पत्रात समितीसमोर मी चार मुद्दे मांडले होते; ते असे :-
admin यांनी शनी, 17/12/2016 - 13:29 ह्यावेळी प्रकाशित केले.
लेखनप्रकार:
आंदोलन
आगामी कार्यक्रम
शेतकरी संघटना
शेतकरी संघटनेचे महात्माजींना साकडे आंदोलन
दिनांक : सोमवार, ३० जानेवारी २०१७
स्थळ : बापूकुटी, सेवाग्राम, वेळ : दुपारी १ ते ४
शेतीचे आर्थिक स्वातंत्र्य समाजवादाच्या सोनेरी पिंजर्यात कैद करुन ग्रामसुराज्याची संकल्पना पायदळी तुडविणार्या सर्व राजकीय पक्षांची राष्ट्रपित्याकडे तक्रार नोंदवण्यासाठी आणि “सब राजकीय दलोंको सन्मती दे भगवान” अशी महात्म्याच्या समोर प्रार्थना करण्यासाठी सोमवार, दिनांक ३० जानेवारी २०१७ रोजी म.गांधीजींच्या पावन वास्तव्याने पुणीत झालेल्या बापूकुटीसमोर दुपारी १ वाजता महात्माजींना साकडे आंदोलन करण्यात येणार आहे.