गंगाधर मुटे यांनी शनी, 17/04/2021 - 22:09 ह्यावेळी प्रकाशित केले.
लेखनप्रकार:
वाङ्मयशेती
शेतकरी संघटनेला गवसलेले अनमोल रत्न ऍड वामनराव चटप
स्पष्ट विचार, निर्भिड मांडणी, धडाडीचे कर्तुत्व, सचोटी, प्रामाणिकपणा, अभ्यासू, जिज्ञासु व कर्तव्याप्रती समर्पित भाव अशी आणि अशा तऱ्हेची सर्व गूणविशेषणे ज्याला तंतोतंत लागू पडतात आणि ज्यांच्या कर्तुत्वाचा आलेख मांडायला शब्दही अपुरे पडतात अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे ऍड वामनराव चटप.
admin यांनी शनी, 17/12/2016 - 13:29 ह्यावेळी प्रकाशित केले.
लेखनप्रकार:
आंदोलन
आगामी कार्यक्रम
शेतकरी संघटना
शेतकरी संघटनेचे महात्माजींना साकडे आंदोलन
दिनांक : सोमवार, ३० जानेवारी २०१७
स्थळ : बापूकुटी, सेवाग्राम, वेळ : दुपारी १ ते ४
शेतीचे आर्थिक स्वातंत्र्य समाजवादाच्या सोनेरी पिंजर्यात कैद करुन ग्रामसुराज्याची संकल्पना पायदळी तुडविणार्या सर्व राजकीय पक्षांची राष्ट्रपित्याकडे तक्रार नोंदवण्यासाठी आणि “सब राजकीय दलोंको सन्मती दे भगवान” अशी महात्म्याच्या समोर प्रार्थना करण्यासाठी सोमवार, दिनांक ३० जानेवारी २०१७ रोजी म.गांधीजींच्या पावन वास्तव्याने पुणीत झालेल्या बापूकुटीसमोर दुपारी १ वाजता महात्माजींना साकडे आंदोलन करण्यात येणार आहे.
admin यांनी सोम, 07/11/2016 - 15:07 ह्यावेळी प्रकाशित केले.
लेखनप्रकार:
योद्धा शेतकरी
शरद जोशी यांच्या विचारांची कास धरल्यास देशाची प्रगती
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
कृषी आणि ग्रामीण विकासासाठी शरद जोशी यांच्या विचारांची कास धरली तरच देशाची प्रगती होईल, असे मत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी व्यक्त केले. सध्या विचारभिन्नतेपेक्षाही विचारशून्यता वाढत असून त्याची चिंता वाटते, असेही गडकरी म्हणाले.