युगात्मा शरद जोशी यांची ८५ वी जयंती दिनांक ०३ सप्टेंबर २०२० रोजी महाराष्ट्रसह अनेक राज्यात साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर कार्यक्रम आयोजित करता आले नसले तरी सर्वत्र कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन करून छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सोबतच फेसबुक, व्हाटसप व अन्य सोशल माध्यमांचा वापर करून युगात्मा शरद जोशींना अभिवादन करण्यात आले.
युगात्मा शरद जोशी यांच्या ८५ व्या जयंतीनिमित्त झूमवर सायंकाळी ७. वाजता वेबिनार आयोजित करून
तंत्रज्ञान स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला.
स्व. विनोद दुबे श्रद्धांजली वेबिनार
दिनांक : ०४ सप्टेंबर २०२०
वेळ : सायंकाळी ७. वाजता
समन्वयक : ऍड सतीश बोरुळकर
प्रास्ताविक : श्री गंगाधर मुटे
शोकसुमने : श्री ऍड वामनराव चटप, श्री अनिल घनवट, श्रीमती सुमनताई अग्रवाल, श्रीमती सीमा नरोडे, श्री मधुसूदन हरणे, श्री सुधीर बिंदू, श्री सचिन डाफे
******
******
शेतकरी संघटनेचे आणि चाकण शिक्षण मंडळाचे संस्थापक श्री शरद जोशी यांच्या जन्म दिना निमित्ताने ०३ सप्टेंबर २०२० रोजी चाकण शिक्षण मंडळाचे कला वाणिज्य महाविद्यालय आणि अभिमन्यु शेलार व मित्र परिवार यांनी एकत्रितपणे ‘योद्धा शेतकरी युगात्मा शरद जोशी तीन दिवसीय वैचारिक व्याख्यानमाला’ आयोजित केली होती.
२०२०-२१ हे या व्याख्यानमालेचे ८ वे वर्ष.
******
प्रतिक्रिया
श्रीधरजवळा
श्रीधरजवळा तालुका परतुर जिल्हा जालना येथे शेतकरी संघटनेचे जेस्ठ शेतकरी नेते बाबासाहेब खरात व हारीभाऊ राजबिंडे त्रिमंक राथबिंडे सिध्शवर राजबिंडे रामराव खरात लहू खरात महादेव आणा राजबिंडे ईदर खरात रयत क्रांती संघटना युवक अध्यक्ष गजानन राजबिंडे
बुलडाणा
हिंगोली
धुळे
राळेगाव
बुलडाणा
समुद्रपूर
लाखो शेतकऱ्यांचे दैवत युगात्मा स्व.शरद जोशी यांची ८५ व्या जयंती साजरी
- उपस्थितीतांनी शरद जोशींच्या विचाराव चालण्याचा केला संकल्प
समुद्रपुर: बाजार समितीत मध्ये कोटी कोटी शेतकऱ्यांचे पंचप्राण लाखो शेतकऱ्यांचे दैवत शेतकरी तंत्रज्ञान स्वातंत्र्याचे जनक युगात्मा, अशा कित्येक नावाने तळागळात ओळख निर्माण केलेल्या शेतकरी संघटनेचे संस्थापक स्व.शरद जोशी यांची ८५ व्या जयंती समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपस्थित शेतकरी संघटनेच्या पाईकानी युगात्मा शरद जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन अर्चना करुन पुष्पहार अर्पण विन्रम अभिवादन केले.
यावेळी डॉ हेमंत ईसनकर यांनी युगात्मा शरद जोशी यांच्या चारित्रावर प्रकाश टाकत त्यांनी तळागाळातील शेतकऱ्यांना त्याच्या घामाचे दाम मिळून देण्यासाठी केलेल्या संघर्षावर विचार व्यक्त करीत शरद जोशी यांचे एका दाण्याचे शंभर दाणे पिकविणारा शेतकरी सुखी झाला पाहिजे हे स्वप्नन पुर्ण करण्यासाठी सर्वच पक्षातील,संघटनातील, लोकांनी आपले जाती धर्म पंथ विसरून काम केले तर शरद जोशी यांनी पाहिले स्वप्न पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करीत ३ सप्टेंबर हा दिवस शेतकरी तंत्रज्ञान स्वातंत्र्य दिन म्हणून पाळायचा असु शेतकऱ्यांनी आपल्या आर्थिक स्वातंत्र्याच्या लढाईत भाग घ्यावा असे शेतकऱ्यांना आवाहन केले.यावेळी समुद्रपुर बाजार समितीचे सभापती हिम्मत चतुर उपाध्यक्ष मनिष निखाडे, संचालक व शेतकरी संघटनेचे जिल्हाअध्यक्ष उल्हास कोटमकर,जीवन गुरनुले, शालीक वैद्य ,अशोक वांदीले, सरपंच किसणाजी शेंडे, प्रवीण महाजन, दीनेश महाकाळकर, देवीदास चौधरी, सुनील हिवसे, शांतीलाल गांधी, कृषि उत्पन्न बाजार समिती सचिव व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
बुलडाणा
बुलढाणा जिल्हात सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, लोणार तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यानी दुसरबीड येथे जे.के. खरात यांच्या मंगल कार्यालयात युगात्मा शरद जोशी यांचा जन्म दिवस साजरा केला. त्यात वामनराव जाधव,श्रीराम दराडे गुरुजी,रमेश पागोरे,सुरेश हाडे,तेजराव मुंढे,अहमत खा पठाण ,इसाक भाई,रमेश सांगळे,जालिंदर कुडे,जे.के.खरात ,लिंबाजी डोईफोडे,ज्ञानबा मुंढे,खुशालराव मुंढे,भास्कराव काकड, प्रभू सांगळे आणि अनेक मान्यवर मंडळी उपस्तीत होती.वामनराव जाधव यांनी शरद जोशींच्या स्वतंत्रवादी विचारांचा संपूर्ण आढावा घेतला. स्वतंत्रता हा अविरत चालणार मार्ग आहे,शरद जोशींचा विचारच देशाला आर्थिक संकटातून वाचवू शकतो. त्या करता पणती तेवत ठेवण्याचे आव्हान केले.
हिंगोली
वणी
शेतकरी संघटना वणी तालुका जिल्हा यवतमाळ च्या वतीने चारगाव चौरस्ता येथे युगातल्या शरद जोशी यांची जयंती साजरी यावेळी शेतकरी संघटनेचे जेष्ठ कार्यकर्ते देवरावजी धांडे, दशरथ जी बोबडे व इतर कार्यकर्ते
तंत्रज्ञान स्वातंत्र्य लढ्याला यश मिळाल्याचा आनंद,,,,!
तंत्रज्ञान स्वातंत्र्य लढ्याला यश मिळाल्याचा आनंद,,,,!
3 सप्टेंबर हा युगात्मा शरद जोशी यांच्या जयंतीचा दिवस. सर्व शेतकरी संघटनेचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, पाईक या कार्यक्रमात सहभागी झाले असतांना, दुपारी टाइम्स ऑफ इंडियाच्या पोर्टलवर एक बातमी दिसू लागली. आता बीटी वांग्याच्या चाचणीला केंद्र सरकारचा हिरवा कंदील!
हे तसं पाहिलं तर खरंच सुखद धक्का देणाराच प्रसंग आहे. ज्याचे स्वप्नं युगातम्याने बघितले होते, त्याचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही त्यांच्याच जयंतीदिवशी घेत आहोत. लढाई आपण पूर्ण जिंकलो नाही पण पहिला गड काबीज केला, याचा आनंद मात्र निश्चितपणे आहे. या निमित्ताने स्व. अजित नरदे यांची आठवण होणे क्रमप्राप्त आहे.
अकोल्यात पहिली तंत्रज्ञान स्वातंत्र्य परिषद घेऊन त्यांनी या लढाईला नव्या जोमाने परत सुरवात केली होती. आमचे अध्यक्ष अनिल घनवट, माजी अध्यक्ष गुणवंतराव पाटील, माजी आमदार वामनराव चटप, सरोज ताई, आमचे मार्गदर्शक ललित बहाळे, सीमाताई नरोडे, सतीश दाणी, गंगाधर मुटे,सतीश देशमुख, सुधीर बिंदू अश्या तमाम सहकाऱ्यामुळे हे शक्य होत आहे.
झिरो ग्राउंड वरून जेंव्हा हे आंदोलन पेट घेते त्या साठी मैदान उपलब्ध पाहिजे असते. अर्थात ते काम आमच्या ललितदादा बहाळे, लक्ष्मीकांत कौठकर, विक्रात, नेमाडे, राहुलदादा, ज्योत्स्नावहिनी साहेब यांनी पार पाडले व कारवाईची पर्वा न करता आपल्या मालकीचे शेत उपलब्ध करुन दिले. देशभरातल्या मीडिया हाऊसने याची दखल घेतली. विदेशात सुद्धा बातम्या झळकल्या, सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली. काय करावे या संभ्रमा अवस्थेत ललितदादा, धनंजय मिश्रा, डॉ निलेश पाटील, अविनाश नाकट, सतीशबाबा, लक्ष्मीकांत सह विविध प्रकारच्या कलमांची सरबत्ती करून गुन्हे दाखल करण्यात आले होते, आमचे उच्च न्यायालयाचे वकील सतीश बोरूळकर, दिनेश शर्मा यांनी हे प्रकरण फेस केले. तेंव्हा कुठे दिलासा मिळाला.
शेतकरी संघटनेने दिल्ली, मुंबईत हा लढा सुरू ठेवला तेंव्हा कुठे यश दिसू लागले आहे. हा आपल्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचा विजय आहे. आज स्व. विनोद दुबे असते तर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला असता. ,हे काम आता आमचे सहकारी मित्र विलासभाऊ ताथोड यांनी सुरू ठेवावे अशी अपेक्षा आहे कारण तंत्रज्ञान स्वातंत्र्याची पुढची लढाई आता कापसाची राहणार आहे........!
धनंजय मिश्रा, अकोला
https://timesofindia.indiatimes.com/india/agri-scientists-welcome-geacs-...
स्व. विनोद दुबे श्रद्धांजली वेबिनार
स्व. विनोद दुबे श्रद्धांजली वेबिनार
दिनांक : ०४ सप्टेंबर २०२०
वेळ : सायंकाळी ७. वाजता
समन्वयक : ऍड सतीश बोरुळकर
प्रास्ताविक : श्री गंगाधर मुटे
शोकसुमने : श्री ऍड वामनराव चटप, श्री अनिल घनवट, श्रीमती सुमनताई अग्रवाल, श्रीमती सीमा नरोडे, श्री मधुसूदन हरणे, श्री सुधीर बिंदू, श्री सचिन डाफे
तंत्रज्ञान स्वातंत्र्य दिवस
युगात्मा शरद जोशी यांच्या ८५ व्या जयंतीनिमित्त झूमवर सायंकाळी ७. वाजता वेबिनार आयोजित करून तंत्रज्ञान स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला.
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
आवागमन
आज सर्वाधिक वाचले गेलेले
सर्वकाळ सर्वाधिक वाचन झालेले