Blogs

शेतकरी संघटनेचे अर्थशास्त्र : खंडन-मंडन

चारही वक्ते त्यादिवशी जीव ओतून बोलले. माधवराव मोरे आणि प्रल्हाद कराड पाटील यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा उत्कटपणे मांडल्या. डॉ. दांडेकर यांनी त्यांच्या वक्तव्याच्या ओघाला शास्त्राच्या बुद्धिनिष्ठतेचा चौथरा देत आपल्या खास शैलीत विचारांची मांडणी केली. त्यानंतर शरद जोशी यांनी डॉ. दांडेकरांच्या भूमिकेचे अवधान ठेवून आपल्या मतांची कौशल्याने उभारणी करीत समारोप केला.

अर्थशास्त्रासंबंधी एका किचकट विषयावरील तीन तासांची चर्चा सभागृहानेही एकतानतेने ऐकली हा अभुतपुर्व प्रसंग होता. या सभेतील विचारांचे संकलन म्हणजेच "शेतकरी संघटनेचे अर्थशास्त्र : खंडन-मंडन" आदरणीय प्रा. सुरेशचंद्र म्हात्रे सरांनी दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने हे पुस्तक डिजिटल आवृत्ती मध्ये उपलब्ध करून दिले आहे.
पुस्तक वाचण्यासाठी येथे किंवा फोटोवर क्लिक करा.

Read More

युगात्मा शरद जोशी स्मारक

बदलत्या काळाच्या प्रवाहाचा वेध घेत १९९२ मध्ये द्रष्टे शेतकरी नेते शरद जोशी यांनी शेतकरी उत्पादक कंपनीची संकल्पना मांडून शेतकऱ्यांनी यापुढे सीता शेती, माजघर शेती, व्यापार शेती आणि निर्यात शेती अशी चतुरस्त्र शेती करावी, असे आवाहन केले होते. सोबतच काही प्रात्यक्षिके म्हणून त्या दिशेने पाऊलही टाकले होते पण....
त्यावेळेस शासकीय धोरणे शेती प्रक्रिया व्यवसायाला पूर्णतः प्रतिकूल असल्याने ही दार्शनिक प्रात्यक्षिके आदर्श मॉडेलमध्ये रूपांतरित होऊ शकली नव्हती. त्यासोबतच रस्त्यावरची लढाई निकराने लढण्यातच पुरेशी दमछाक झाल्याने संघटनेच्या पाईकांना आर्थिक लढाई लढायला उसंतच मिळाली नाही.

युगात्मा शरद जोशी स्मारक
युगात्मा जोशींचे स्मारक म्हणजे त्यांच्या अपूर्ण स्वप्नांची पूर्तता करणारे आदर्श मॉडेल असेल. या उपक्रमाचे ३ विभागात वर्गीकरण असेल.

१) स्मृतींचे जतन - युगात्मा शरद जोशींच्या स्मृतींची जपणूक, स्मृती समारंभ, प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन, चिंतन-मनन सुविधा व विचारप्रसारासाठी युगात्मा स्मारक 
२) साहित्य प्रसार - युगात्मा शरद जोशींच्या साहित्याच्या प्रसारासाठी युगात्मा ग्लोबल ग्रंथालय. ग्लोबल ग्रंथालयाची व्याप्ती मोठी असेल जेथे शेतीविषयातील सर्व साहित्याचा संग्रह असेल. सोबतच Online ग्लोबल डिजिटल ग्रंथालय ही कल्पना सुद्धा आपल्याला साकार करायची आहे. शेती विषयातील सर्व ग्रंथ, प्रबंध, शोधप्रबंध, पुस्तके, विशेषांक, कादंबरी, काव्यसंग्रह यासहित सर्व शेती साहित्य एकत्रितपणे वाचकांना व अभ्यासकांना उपलब्ध करून देणे हा यामागील प्रमुख उद्देश असणार आहे.

३) युगात्मा शरद जोशी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी - सीता शेती, माजघर शेती, व्यापार शेती व निर्यात शेतीची शरद जोशींची संकल्पना साकार करण्यासाठी

 

Read More

युगात्मा शरद जोशी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड

१९९२ मध्ये शरद जोशींच्या गुरुकिल्लीकडे कानाडोळा करणाऱ्या शासनाने कालांतराने मात्र हीच संकल्पना शरद जोशींचे नाव न घेता आडपडद्याने स्वीकारली. शेतमाल प्रक्रियेला प्रतिकूल असलेली पूर्वीची धोरणे हळूहळू अनुकूल व्हायला लागली. शेतकरी उत्पादक कंपन्यांना मदत करण्यासाठी स्वतंत्र विभागांची निर्मिती झाली आणि......
आता तर शेतकरी उत्पादक कंपन्यांना भरघोस अनुदान देणाऱ्या विविध योजना अस्तित्वात आल्या आहेत. जागतिक बँकेच्या सहकार्याने अर्थपुरवठा केला जात आहे. शेतकऱ्यांनी एकजूट करून शेतमाल मूल्यसाखळी विकसित करण्याची, प्रक्रिया उद्योग उभारण्याची, शेतमाल प्रक्रिया उद्योगाचा पाया रचण्याची हीच योग्य वेळ आहे.

युगात्मा शरद जोशी स्मारक

युगात्मा जोशींचे स्मारक म्हणजे त्यांच्या अपूर्ण स्वप्नांची पूर्तता करणारे आदर्श मॉडेल असेल. या उपक्रमाचे ३ विभागात वर्गीकरण असेल.
 
१) स्मृतींचे जतन - युगात्मा शरद जोशींच्या स्मृतींची जपणूक, स्मृती समारंभ, प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन, चिंतन-मनन सुविधा व विचारप्रसारासाठी युगात्मा स्मारक
२) साहित्य प्रसार - युगात्मा शरद जोशींच्या साहित्याच्या प्रसारासाठी युगात्मा ग्लोबल ग्रंथालय. ग्लोबल ग्रंथालयाची व्याप्ती मोठी असेल जेथे शेतीविषयातील सर्व साहित्याचा संग्रह असेल. सोबतच Online ग्लोबल डिजिटल ग्रंथालय ही कल्पना सुद्धा आपल्याला साकार करायची आहे. शेती विषयातील सर्व ग्रंथ, प्रबंध, शोधप्रबंध, पुस्तके, विशेषांक, कादंबरी, काव्यसंग्रह यासहित सर्व शेती साहित्य एकत्रितपणे वाचकांना व अभ्यासकांना उपलब्ध करून देणे हा यामागील प्रमुख उद्देश असणार आहे.
३) युगात्मा शरद जोशी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी - सीता शेती, माजघर शेती, व्यापार शेती व निर्यात शेतीची शरद जोशींची संकल्पना साकार करण्यासाठी
 
पहिले वर्ष - पहिला टप्पा :
पहिल्या टप्प्यात पहिल्यावर्षी आपल्याला युगात्मा शरद जोशी फार्मर्स प्रोड्युसर कंपनीवर लक्ष केंद्रित करायचे आहे. ''सीता शेती, माजघर शेती, व्यापार शेती, निर्यात शेती..... म्हणजेच युगात्मा शरद जोशींच्या स्वप्नातील भारत''
 
         बदलत्या काळाच्या प्रवाहाचा वेध घेत १९९२ मध्ये द्रष्टे शेतकरी नेते शरद जोशी यांनी शेतकरी उत्पादक कंपनीची संकल्पना मांडून शेतकऱ्यांनी यापुढे सीता शेती, माजघर शेती, व्यापार शेती आणि निर्यात शेती अशी चतुरस्त्र शेती करावी, असे आवाहन केले होते. सोबतच काही प्रात्यक्षिके म्हणून त्या दिशेने पाऊलही टाकले होते पण त्यावेळेस शासकीय धोरणे शेती प्रक्रिया व्यवसायाला पूर्णतः प्रतिकूल असल्याने ही दार्शनिक प्रात्यक्षिके आदर्श मॉडेलमध्ये रूपांतरित होऊ शकली नव्हती. त्यासोबतच रस्त्यावरची लढाई निकराने लढण्यातच पुरेशी दमछाक झाल्याने संघटनेच्या पाईकांना आर्थिक लढाई लढायला उसंतच मिळाली नाही.

        १९९२ मध्ये शरद जोशींच्या गुरुकिल्लीकडे कानाडोळा करणाऱ्या शासनाने कालांतराने मात्र हीच संकल्पना शरद जोशींचे नाव न घेता आडपडद्याने स्वीकारली. शेतमाल प्रक्रियेला प्रतिकूल असलेली पूर्वीची धोरणे हळूहळू अनुकूल व्हायला लागली. शेतकरी उत्पादक कंपन्यांना मदत करण्यासाठी स्वतंत्र विभागांची निर्मिती झाली आणि आता तर शेतकरी उत्पादक कंपन्यांना भरघोस अनुदान देणाऱ्या विविध योजना अस्तित्वात आल्या आहेत. जागतिक बँकेच्या सहकार्याने अर्थपुरवठा केला जात आहे. शेतकऱ्यांनी एकजूट करून शेतमाल मूल्यसाखळी विकसित करण्याची, प्रक्रिया उद्योग उभारण्याची, शेतमाल प्रक्रिया उद्योगाचा पाया रचण्याची हीच योग्य वेळ आहे.

 
युगात्मा शरद जोशी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी Companies Act, 2013 नुसार रजिस्टर झाली असून ३१ जानेवारी २०२२ रोजी नोंदणी, पॅन व टॅन प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
 
सभासद व्हा, भागधारक व्हा
  • १८ वर्षावरील कुणीही भारतीय व्यक्ती कंपनीचा भागधारक होऊ शकेल.
  • महिलांना प्राधान्य 
आपण सभासद (शेअरहोल्डर) होऊ इच्छित असाल तर आपणास खालील बाबींची पूर्तता करावी लागेल.
 
  1. आपला सभासद अर्ज सादर करावा लागेल. अर्जासोबत आधार, पॅन, फोटो व सातबारा, ८ अ. जोडावा लागेल. कुटुंब प्रमुखाच्या नावाने असलेला ७/१२ चालेल. स्वतःच्या नावानेच असला पाहिजे हे बंधन नाही.
  2. शेतकरी नसल्यास भूमिहीन असा उल्लेख अर्जात करून बिगर शेतकऱ्यांनाही सभासदत्व (शेअरहोल्डर) मिळवता येईल.
  3. शेअरची रक्कम कंपनीच्या खात्यावर जमा करावी लागेल.
  4. १८ वर्षावरील व्यक्ती सभासद होऊ शकतो.
  5. एका कुटुंबातील कितीही सदस्य सभासद होऊ शकतात.
सभासदत्व मिळवण्यासाठी करावयाचा अर्ज :
  1. वरील Download बटणवर क्लिक करून अर्ज डाउनलोड करावा. पूर्ण फॉर्म व्यवस्थित भरून कंपनीच्या पत्यावर पोस्टाने पाठवावा. (कुरिअरने पाठवू नये.) तसेच व्यवस्थित स्कॅनिंग करून एक प्रत yugatma@gmail.com वर किंवा व्हाटसपवर पाठवावी.
  1. 'युगात्मा शरद जोशी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी" या नावे चेक लिहून अर्जासोबत जोडावा किंवा ऑनलाईन रक्कम भरण्यासाठी बँक डिटेल्सकरीता संपर्क करावा किंवा शुल्काची रक्कम प्रत्यक्ष बँकेत जाऊन रोखीने किंवा NEFT/RTGS च्या माध्यमातून भरावी व पैसे भरल्याची पावती अर्जासोबत जोडावी.
  2. अधिक माहिती yugatma.sharadjoshi.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 
शेअर मूल्य :
 
पुरुषांसाठी शेअर मूल्य : प्रती शेअर एकूण रक्कम रु. १६००/- किंवा त्यापटीत शुल्क भरून कंपनीचे सभासद-भागधारक होता येईल.
महिलांसाठी शेअर मूल्य : प्रती शेअर एकूण रक्कम रु. १४००/- किंवा त्यापटीत शुल्क भरून महिलांना कंपनीचे सभासद-भागधारक होता येईल.
 
: संचालक मंडळ : 
 
आमचे मार्गदर्शक
सौ. सरोजताई रवीभाऊ काशीकर आमचे मार्गदर्शक रामनगर मगनवाडीजवळ वर्धा
अ‍ॅड. श्री वामनराव चटप आमचे मार्गदर्शक देशपांडे वाडी, राजुरा ता- वरोरा जि. चंद्रपूर
====
संस्थापक संचालक मंडळ
 
श्री. गंगाधर महादेवराव मुटे, आर्वी छोटी, ता. हिंगणघाट जि. वर्धा
सौ. शैलजाताई लक्ष्मीकांतजी देशपांडे, जाजुवाडी, आर्वी ता. आर्वी जि. वर्धा
सौ. वंदनाताई वामनराव चटप, देशपांडे वाडी, राजुरा ता. वरोरा जि. चंद्रपूर
श्री. रमेशराव जिजाभाऊ खांडेभराड, शिवनगर, जालना ता. जि. जालना
श्री. दिलीपराव लक्ष्मणराव भोयर, धनोडी, ता. वरुड जि. अमरावती
श्री. जयंतराव रामचंद्र बापट, पहूर इझारा ता. कळंब जि. यवतमाळ
श्री. गणेशराव दिनकरराव पाटील, किनगाव ता. यावल जि. जळगाव
श्री. सुभाषराव धनुजी बोकडे, कुरझाडी जामठा ता. जि. वर्धा
श्री. रविंद्रजी जगन्नाथजी खोडे, सेलडोह ता. सेलू जि. वर्धा
सौ. उषाताई सारंगजी दरणे, टाकळी दरणे, ता. देवळी जि. वर्धा
सौ. मनोरमाताई गणेशराव मुटे, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जिल्हा- वर्धा
 
आपल्या सहकार्याच्या प्रतीक्षेत.
 
आपला स्नेहांकित 
- गंगाधर मुटे  
====
रजिस्टर्ड कार्यालय :
 

ॲग्रीसन हाऊस, आर्वी छोटी - ४४२३०७

ता. हिंगणघाट जि. वर्धा
Mob : 9730582004, 9730786004
=-=-=-=
Read More